सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
यासाठी पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करावा.
पुढील गोष्टी लक्षात घेऊन सिंचनाच्या पाण्याची तपासणी करावी.
पाणी चवीस खारवट किंवा मचूळ वाटत असल्यास, पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास, पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास, जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी द्यावा.
निरनिराळ्या सिंचन साधनांमधून घेतलेला पाण्याचा नमुना प्रा तिनिधिक असावयास पाहिजे.