मातीचा प्रातिनिधीक नमुना कसा घ्यावा

blog image

जागा कशी निवडावी

  • मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय,रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा.
  • मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा,उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत.
  • फारच लहान भाग पाडू नयेत. 

मातीचा प्रातिनिधीक नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत :

१. प्रथम शेतीची पहाणी करून जमिनीच्या गुणधर्मांनुसार (उदा., जमिनीचा रंग, खोली, चढउतार, उंचसखलपणा, पाणथळपणा आणि चोपण इत्यादीनुसार) विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा.

२. नमुना ज्या जमिनीवर घ्यावयाचा आहे, त्या क्षेत्रावर सर्व क्षेत्राचा समावेश होईल अशी काल्पनिक नागमोडी रेषा गृहीत धरून रेषेच्या प्रत्येक टोकावर एक याप्रमाणे अंदाजे १०-१२ ठिकाणचा नमुना घ्यावा.

३.नमुना घ्यावयाचे जागेवरील काडीकचरा बाजूला करून कुदळ किंवा फावड्याच्या साहाय्याने इंग्रजी व्ही (V) आकाराचे खड्डे घ्यावेत.

४.विविध पिकांच्या मुळांच्या वाढीनुसार खड्ड्यांची खोली ठरविणे आवश्यक आहे.

५.जमिनीच्या वरील पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती खड्ड्यांतून खुरप्याच्या/लाकडी खुंटीच्या साहाय्याने खरडून गोळा करावी.

६. १०-१२ ठिकाणच्या एकत्र केलेल्या मातीचे चार समान भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत व उर्वरित दोन भाग एकत्र मिसळून एक किलो माती शिल्लक राहील अशा पद्धतीचा अवलंब करावा.

७. शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयागशाळेत पाठविणे ह्यात दोन आठवडयापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा माती पृथ:करण बदलण्याची शक्यता असते.

८. माती गोळा करण्यासाठी खुरपे, गीरमीट, घमेले इ. वापरावे.धातूचे साहित्य वापरू नये. 

९.माती ओली असल्यास ती कापडावर सावलीत वाळवावी व नंतर स्वच्छ कापडी/पॉलिथीन पिशवीत भरून खाली नमूद केलेल्या योग्य माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी.


माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकावा -

1. नमुना क्रमांक

2. नमुना घेतल्याची तारीख

3. शेतक-याचे संपूर्ण नाव

4. गाव आणि पोस्ट

5. तालुका

6. जिल्हा

7. सर्व्हे किंवा गट क्रमांक

8. नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र

9. बागायत किंवा जिरायत

10. मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात

11. पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात

12. मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये)

13. जमिनीचा उतार किंवा सपाट

14. जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर

15. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट

16. माती नमुना गोळा करणा-याची सही.

माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक नमुना घेताना घ्यावयाची काळजी :

१) शेतात जनावरे बसण्याची जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, विहिरीजवळील जागा, शेतीचा बांध, दलदलीची जागा, झाडाखालची जागा, उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊ नयेत;

) मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर; परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा, शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून नमुना घ्यावा;

३) शेतामध्ये रासायनिक खते,शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्यापूर्वी मातीचा नमुना घ्यावा. रासायनिक तसेच सेंद्रीय खते दिल्यानंतर साधारणपणे दोन ते अडीच महिन्यापर्यंत मातीचा नमुना घेऊ नये;

४) निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे वा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत;

५) रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत;

६) मातीचा नमुना घेताना कृषी सहायक किंवा ग्राम विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

https://forms.gle/5opmqnZcKjWGoX4s6


Click here to download attached file
Card image cap
पाण्याचा नमुना कसा घ्यावासंपादन करावा

संपर्कात रहाण्यासाठी