कृषिशास्त्र ही एक कृषि क्षेत्रात उदयास येणारी एक नवीन संकल्पना आहे.
कृषि शास्त्र समुह शेतकऱ्यांना मदत करण्यास तत्पर तसेच जगातील सर्व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यास मदत करेल. यामध्ये आपणांस हवामान अंदाज , माती व पाणी यांचे शास्त्र , फळबाग व फुलबाग लागवड व व्यवस्थापन , पशु व मत्स्य तसेच दुग्ध तंत्रज्ञान , शेतीपयोगी अवजारे, सिंचन उपकरणे, सौर ऊर्जा , कीड व्यवस्थापन , अळिंबी लागवड तंत्रज्ञान, नवीनतम तंत्रज्ञान (drone technology hydroponics, IOT) , आणि कृषि क्षेत्रातील नवीन घडामोडी या सगळ्यांची माहिती पुरवल्या जाईल.
कृषिशास्त्र समुह सर्व संशोधक , शेतकरी आणि विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण विषयांबद्दल आपले मत मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार.
आमचे उद्दीष्टे :-
- शेतकर्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविणे.
- शेतीबद्दल माहिती सहजतेने उपलब्ध करून देणे.
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे वेळोवेळी शंकानिरसन करणे.
- संशोधक , विद्यार्थी आणि प्रगतशील शेतकरी यांना त्यांचे मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे .
- सेंद्रिय कृषि उत्पादने थेट अंतिम ग्राहकांपर्यंत पोहचविणे
- शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव मूल्य प्रदान करण्यास मदत करणे.
भविष्यातील दृष्टिकोन:-
- तांत्रिक दृष्ट्या सक्षम शेतकरी.
- माहिती व शंका निरसणासाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ.
- शेतकरी उत्पादक कंपन्यांचे केंद्रीकरण.
- शेतकऱ्यासाठी डिजिटल व्यासपीठ तयार करून देणे.








