विविध पिकांसाठी माती नमुना घेण्यासाठी जमिनीची खोली आणि फळबागेसाठी जमीन व खारवट व चोपण जमीन

blog image


विविध पिकांसाठी माती नमुना घेण्यासाठी जमिनीची खोली

१. हंगामी पिके – उदा., ज्वारी, भात, गहू, सोयाबीन, भुईमुग इत्यादी. १५-२० सेंमी

२.नगदी पिके – कापूस, ऊस, केळी इत्यादी ३० सेंमी.

३.फळ पिके झाडाच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या थरातून

फळबागेसाठी जमीन :

  • फळझाडांच्या लागवडीसाठी शेतातील मातीचे परीक्षण करून घेऊन योग्य जमिनीची निवड करावी.
  • याकरिता जमिनीच्या गुणधर्मानुसार किंवा प्रकारानुसार वर सांगितल्याप्रमाणे विभाग पाडून प्रत्येक विभागातून नागमोडी वळणावर खड्डे घ्यावेत.
  • फळझाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे जमिनीत ९० सेंमी. किंवा मुरुम अगोदर लागल्यास मुरुमापर्यंत खोल खड्डा करून मातीचे नमुने गोळा करावेत.
  • जमिनीच्या उभ्या छेदाचे ० ते ३० (एक फूट), ३० ते ६० (दोन फूट) व ६० ते ९० (तीन फूट) सेंमी नुसार भाग पाडावेत व प्रत्येक खोलीच्या थरातून सारख्या जाडीची मातीची खाप काढून वेगवेगळ्या पिशवीत भरावी.
  • सर्व खड्ड्यातील थरांप्रमाणे माती ज्या त्या थरांतील खोलीप्रमाणे एकत्र करून एक किलो माती वेगवेगळ्या पिशवीत भरावी. त्यामध्ये नमुन्याची खोली व वरील माहितीची चिठ्ठी टाकावी.

खारवट व चोपण जमीन :

  • खारवट व चोपण जमिनीचे यशस्वीरित्या सुधारणा व व्यवस्थापन करण्यासाठी समस्यांचे स्वरूप आणि त्याची तीव्रता याचे योग्य मूल्यमापन करून निदान होणे जरुरीचे आहे.
  • यासाठी अशा जमिनीतून परीक्षणासाठी मातीचा प्रातिनिधीक नमुना घेणे गरजेचे आहे.
  • जमिनीच्या प्रकारानुसार शेतीचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे विभाग पाडून एका विभागातील एक याप्रमाणे एक मीटर लांब, एक मीटर रुंद व एक मीटर खोल या आकाराचे खड्डे करावेत.
  • खड्ड्याच्या उभ्या छेदाचे ० ते ३० (एक फूट), ३० ते ६० (दोन फूट), ६० ते ९० (तीन फूट) व ९०-१२० (चार फूट) सेंमी असे भाग पाडावेत. प्रत्येक भागातून सारख्या जाडीचा मातीचा थर काढून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरावा.
  • क्षारयुक्त जमिनीच्या पृष्ठभागावर थर असल्यास त्या थरातील माती वेगळी गोळा करावी व योग्य त्या माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी.
Card image cap
मातीचा प्रातिनिधीक नमुना घेण्याची पद्धत व नमुना घेताना घ्यावयाची काळजी
Card image cap
पाण्याचा नमुना कसा घ्यावासंपादन करावा

संपर्कात रहाण्यासाठी