सर्वसाधारणपणे पूजाविधी, सजावट इत्यादीसाठी फुलांचा वापर केला जातो. परंतु, अनेक फुलांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा प्राचीन काळापासून औषध म्हणूनही वापर केला जातो. आयुर्वेदामध्येही फुलांच्या औषधी गुणांचा उल्लेख आढळून येतो. कोणती फुल कोणत्या आजारावर गुणकारी आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फुलांचे उपयोग
1) जुई
जुईच्या झाडाची पानं चावून, बराच वेळ त्याचा रस तोंडात तसाच ठेवा. त्यानंतर काही वेळाने पाण्याने चूळ भरा. यामुळे दातांच्या तक्रारी दूर होतात.
2) जास्वंद
डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजारांवर फायदेशीर आहेत. ही फुले वाटून साखरेसोबत खावी. याव्यतिरिक्त महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही जास्वंदीचे फुल गुणकारी आहे.
3) चमेली
चमेलीच्या झाडाची पाने चावल्याने माउथ अल्सरपासून सुटका होते. याव्यतिरिक्त सकाळी चमेलीची फुले डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
4) गुलाब
गुलाबाची पाने दूधामध्ये उकळून दररोज प्यायल्याने बद्धकोष्ठाता दूर होते. दूधाच्या पाकळ्या दूधासोबत वाटून लावल्याने चेहरा उजळतो.
5) सूर्यफूल
सूर्यफूलाच्या पाकळ्या नारळाच्या तेलामध्ये मिसळू काही दिवस उन्हात ठेवा. या तेलाने शरीराला मालिश करा. यामुळे त्वचेच्या समस्या किंवा इन्फेक्शन दूर होते.
6) पारिजात फुल
पारिजात फुलाच्या तेलामध्ये अँटी अॅलर्जिक गुणधर्म असतात. याच कारणामुळे कित्येक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये, बॉडी सीरममध्ये इत्यादी उत्पादनांमध्ये या फुलाच्या तेलाचा वापर केला जातो.
पारिजातच्या बिया, पाने आणि फुलांमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. एखादी जखम भरण्यासाठीही या फुलाचा लेप वापरला जातो.