कडुलिंब आरोग्य फायदे

blog image

 कृषिशास्त्र



आरोग्य माहिती 

कडुलिंब

शास्त्रीय नाव - - -  Azardiracta Indica


जेव्हा टूथपेस्ट आणि ब्रश हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हाच्या काळात दातांच्या आरोग्यासाठी कडुलिंबाची पानं आणि झाडाच्या कोवळ्या फांद्याच उपयोगात आणल्या जायच्या. आजसुद्धा ग्रामीण भागातली लोकं कडुलिंबाच्या कोवळ्या फांद्यांनीच दात स्वच्छ करात. आयुर्वेदानुसार दातांच्या आणि तोंडातल्या इतर आजारांसाठी क़डुलिंब सर्वोत्तम आहे. एवढंच नव्हे तर कडुलिंब अनेक गंभीर रोगांच्या उपचारासाठीसुद्धा फायदेशीर ठरतो. सकाळी उठल्यानंतर झाडाची 4-5 पानं तोडून नुसती जरी दातांनी चावली तरीसुद्धा तुमचं आरोग्य उत्तम राहतं. कडुलिंबाच्या पानांचे आणखी कोण कोणते फायदे आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्वचा रोग - कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी फंगल, अँटी डोयबेटिक, अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि गर्भनिरोधक मानलं जातं. कडू लिंबाच्या पानांपासून काढलेलं तेल रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं.


कॅन्सर - सगळ्यात कडू वनस्पती म्हणून ओळखले जाणारे कडुलिंब आरोग्यासाठी तितकंच फायद्याचं आहे. कडुलिंब कॅन्सरसारख्या रोगांना दूर ठेवतो. यात असलेलं पोलिसाकेराइट (Polysaccharide) आणि लिमोनीड (Limonide) मानवी शरीरात कॅन्सरच्या पेशींची आणि ट्युमरची वाढ रोखतात. कडुलिंबाचा नियमित वापर केल्याने आपली प्रतिकारक क्षमता वाढते. ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलांनासुद्धा कडुलिंबयुक्त कॅप्सूल दिले जातात. कॅन्सर दूर ठेवायचा असेल तर दररोज तुम्ही 5-10 कडुलिंबाची कोवळी पानं चावून खावी.
बुरशीजन्य आजार - कडुलिंबाची अशी औषधी वनस्पती आहे जी आपल्या त्वचेला कोणत्याही प्रकारच्या फंगल म्हणजेच बुरशीजन्य आजारांपासून संरक्षित करतं. दररोज कडुलिंबाची पानं चावल्याने त्याचा अर्क शरीरात उतरतो त्यामुळे बुरशीजन्य आजारांपासून तुम्ही दूर राहता.

दातांचं आरोग्य - कडुलिंबाच्या पानांचा अर्क दातांवर आणि हिरड्यांवर जर दररोज तुम्ही लावला तर दातांचं आरोग्य उत्तम राहतं. तोंडात तयार होणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या कमी होते. यामुळे दातांवर घाण साचत नाही. कडुलिंबाचा अर्क न मिळाल्यास झाडाची 5-7 पानं दररोज तोडून ती सकाळी उठल्यानंतर चावावी. किमान दोन आठवडे तुम्ही हा प्रयोग केल्यास दात आणि हिरड्यांवरची सूज कमी होते.

अल्सर - कडुलिंबाच्या झाडाच्या सालीचा अर्क 10 आठवडे दिवसातून दोनदा घेतल्याने पोट आणि आतड्यांचा अल्सर बरा करण्यासाठी फायदेशीर ठरतो. मात्र हा प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

सोरायसिस - सतत 12 आठवडे जर तुम्ही कडुलिंबाचा अर्क सेवन केला तर सोरायसिस हा त्वचेचा आजार बरा होण्यास मदत होते. हा उपचार करण्याआधीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

चिंच शरीरातलं इन्सुलिन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे ; 
Card image cap
सर्वसाधारणपणे पूजाविधी, सजावट इत्यादीसाठी फुलांचा वापर केला जातो. परंतु, अनेक फुलांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा प्राचीन काळापासून औषध म्हणूनही वापर केला जातो.
Card image cap
आयुर्वेदात तुपाचे महत्व सांगण्यात आले आहे. यामध्ये औषधे तुपातून घेण्याचा सल्ला दिला जातो. तूपाचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास वजन कमी होऊ शकते. म्हणूनच आहारतज्ञ चपातीला तेलाऐवज तूप लावून खाण्याचा सल्ला देतात. हे मधुमेहींसाठीही लाभदायक आहे. तूप पौष
Card image cap
थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते.

संपर्कात रहाण्यासाठी