भुईमुंग पिके पिवळी पडण्याची कारणे
उन्हाळ्यात भरघोस उत्पन्न देणारे पीक म्हणुन भुईमूग ओळखले जाते.
परंतु बदलत्या वातावरणामुळे त्यावर सुद्धा रोगराई येत आहे.
खूप शेतकऱ्यांच्या शेतात भुईमुगाची झाडे पिवळी झालेली आढळत आहे.
त्याची मुख्यता खालील कारणे असू शकतात.
----------------------------------------
1) हुमनी अळी आणि उदरी
शेतकरी मित्रांनी भुईमुगाच्या मुळाजवळ एक वेळा निरीक्षण करावे जर आपल्यास पांढऱ्या रंगाचे C आकाराचे किडे आढळल्यास ती हुमनी अळी आहे तसेच उदरी सुद्धा मुख्यतः मुळावरच घात करते यामुळे झाडाची वाढ खुंटून झाडे पिवळी पडण्यास सुरुवात होते.
----------------------------
जर आपल्यास वरीलपैकी कोणतेही दोन किडे आढळल्यास क्लोरोपायरीफॉस 20% Ec याची ड्रेनचीग करावी
तसेच उदरी चे वारुळ नष्ट करावे.
---------------------------------------
2) रस शोषण करणाऱ्या कीड यांचा प्रादुर्भाव
भुईमुंग मुख्यतः तुडतुडे, मावा या दोन रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळतो.
तुडतुडे मुळे पाने पिवळी पडून खालच्या बाजूला चांदनी रंगाचे वळण दिसते.
तसेच या दोन किडा मुळे बड नेक्रोसिस तसेच Rosette एक व्हायरस पसरवला जातो
ज्यामुळे पाने पिवळी पडतात या दोन किड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चिकट सापळे एकरी दहा ते पंधरा लावावे.
तसेच कोणते पण आंतरप्रवाही कीटकनाशक याचा वापर करावा
3) लोहाची कमतरता:-
नवीन फुटलेल्या पानांवर आपल्याला हिरवा रंग न दिसता शिरा पिवळसर झालेल्या दिसतात. (Interveinal Chlorosis)
लोहाची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट 0.5 % आणि झिंक सल्फेट 0.5 % याचा फवारा घ्यावा.
कृपया शेतकरी मित्रांनी भुईमुगाची योग्य निरीक्षण करून पिक संरक्षण वापर करावा.
----------------------------------------
तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत अर्थात 55 दिवस झाल्यानंतर जिप्सम चा डोस शेतात द्यावा त्यामुळे शेंगा चांगल्या प्रकारे भरण्यास मदत होणार.
Team कृषि शास्त्र