*कृषि शास्त्र समुह*
???? *रताळे*
Name-ipomea batatas
आरोग्यदायी फायदे:
* रताळे यामध्ये कॅन्सरशी लढणारे घटक असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. यातील "प्रोटिझ इनहिबिटर" हे प्रथिने कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबवण्याची क्षमता या प्रथिनांमध्ये असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे.
* रताळ्यांमध्ये तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहण्यास मदत होते.
* रताळेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व "अ" असते. आपले डोळे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी हे महत्वाचे जीवनसत्व असल्याने आजारपणही जास्त उद्भवत नाही.
* रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये "बिटा केरोटिन" हे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे कॅन्सर तसंच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो.
यातील जीवनसत्व क खाणाऱ्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर, पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते.
* रताळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवत नाही. सोबतच याचाच फायदा वजन आटोक्यात आणण्यासाठी होती. या गुणधर्मामुळे रताळे मधुमेहच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते
* वजन वाढण्यात अन्नातल्या उर्जा (कॅलरीज) चा सर्वात मोठा वाटा असतो. रताळ्यात कॅलरीजचं प्रमाण प्रत्येकी १०० ग्राम मागे फक्त ८६ एवढं कमी असतं.
रताळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. या गुणधर्मामुळे डिहायड्रेशन (निर्जलीकरण) होत नाही. निर्जलीकरणमुळे चयापचय क्रियेवर होणारा दुष्परिणाम टाळला जातो.
* रताळे मध्ये लोहाचा स्रोत जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे खाणाऱ्यांची हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
* रताळ्यात पिष्टमय पदार्थाचा प्रकार हा घटक असतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त मेद (चरबी) कमी करण्याचं काम करतो. सोबतच तयार होणाऱ्या नवीन मेदावारही नियंत्रण आणतो.
* रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे चार ग्राम फायबर असते. म्हणूनच उपवासाच्या दिवसाव्यतिरिक्त रताळ्याचा आहारात समावेश करु शकता.