"कृषि शास्त्र"
Use of artificial intelligence in Seed technology will boost seed farmer income in India.
शेती क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. अँग्रीकल्चर कंपन्यांचाही महत्वाचा वाटा आहे.
अनेक शेतकऱ्यांचे बियाणे पेरणी नंतर त्याची उगवण क्षमता चांगली नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक बोगस कंपन्याही बाजारात बियाणे आणि इतर कृषी निविष्ठाचे उत्पादन करतात. आणि अश्या बोगस कंपन्यांमुळे नुकसान होते ते शेतकऱ्यांचे , आणि पेरणी खर्च ही न निघाल्याने शेतकरी कर्जपुरवठा ही व्यवस्थित करु शकत नाहीत. अश्या अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते त्यासाठी शेती करणात कृषी निविष्ठा चांगल्या प्रतीच्या असणे खूप आवश्यक आहे.
अँग्रीकल्चर मधील स्टार्ट अप (Agriculture Startup) कंपनी 'अगधी'ने एक आर्टिफिशअल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी आणली आहे. (AI Technology) याच्या मदतीने बियाणे पाहून आपल्याला कसे उत्पन्न येईल याची माहिती होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य बियाण्यांची निवड करता येईल.
बियाणे पाहून कळणार माहिती
आर्टिफिशियल लिजेंस टेक्नोलॉजीच्या मदतीने शेतकऱ्यांना , बियाण्यांना पाहून पिकांची गुणवत्ता कशी असेल , कोणत्या बियाण्यांचा वापर केल्याने आपल्याला उत्पन्न अधिक होईल याची सर्व माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या तंत्रज्ञाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.स्टार्ट अपच्या अंतर्गत बीज आणि पिकांमधील उणीव भरून काढण्यासाठी मशीन लर्निंग आणि कॉम्प्यूटर व्हिजन या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांना चांगले बी आणि अधिक उत्पन्न मिळू शकेल अशी खात्री आहे .शेतकरी कमकूवत बियांची पेरणी केल्यानंतर होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्याचा बचाव होण्यासाठी हे तंत्रज्ञांन उपयोगी पडेल.
जुन्या पद्धतीने शेतकऱ्यांना बियांची पारख करण्यासाठी खूप वेळ लागत होता. परंतु आता काही सेकंदातच शेतकऱ्यांना बियांची माहिती कळणार आहे. एआय पद्धतीचा मदतीने बियाण्यांचा तपास करणं आणि बियाण्यांची सॅम्पलिग करणे आणि पिकांच्या उत्पादनातील कालावधी किती याची माहिती सहजरित्या शेतकऱ्यांना होणार आहे.
बियाण्यांचा निकृष्टपणा जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना फिजीकल टेस्टवर अवलंबून राहावे लागते परंतु या पद्धतीने ऑटोमॅटीक यंत्रामुळे बियाण्यांची तपासणी केली जाईल.
तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना होणार लाभ
फोटोमेट्री, रेडिओमेट्री आणि कॉम्प्यूटर व्हिजनची अगधी च्या एआय व्हिजन तंत्रज्ञानाच्या मदतीने बिजांच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे. बिजाच्या इमेजपासून त्यांचा रंग,बनावट आणि आकार काढून कॉम्प्युटर व्हिजनने बियांचा निकृष्टपणाची ओळख केली जाईल.