बीज प्रक्रिया कशी करावी?

blog image

बीज प्रक्रिया कशी करावी? 


बीज प्रक्रिया हा लागवड पूर्वी करायची महत्त्वाची प्रक्रिया आहे. 

या मुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पीक पाणी वर परिणाम होत असतोस. 

???? बीज प्रक्रिया पेरणी च्या दिवशी करावी. 

???? बीज प्रक्रिया करताना विविध साहित्याचा एक सुधारित क्रम असतोस. Ex FIR 

सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले तर पहिले बुरशीनाशक, कीटक नाशक (powder or granuler) त्या नंतर जिवाणू संवर्धक उदाहरणात रायजोबीयम,PSB, KMB ईत्यादी. 


???? बिजप्रक्रियेचे फायदे

* जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणारया रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.

* बियाण्याची उगवण क्षमता वाढते.

* रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.

* पिकाच्या उत्पादनात वाढ होते.

* कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मकउपाय करून पेरणी करता येते.


सोयाबीन / तुर बियाण्यास बीज प्रक्रिया करा ( Soybean & Redgram : Seed treatment )

(१) रासायनीक बीजप्रक्रिया : सोयाबीन व तुर बियाण्यास रासायनीक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा म्यांकोझेब हळूवारपणे लावून बीजप्रक्रिया करावी.


(२) जैवीक बीजप्रक्रिया : 

सोयाबीन व तुरीच्या प्रती किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडर ४ ग्रॅम किंवा ५ ग्रॅम 

 अधिक रायझोबियम जपोनिकम १० मिली अधिक पी. एस. बी १० मिली गुळाच्या पाण्यात मिसळून

(२०० मिली पाण्यात ५० ग्रॅम गुळ वापरावा ) लावावे व सावलीमध्ये सुकवून त्याच दिवशी पेरणीसाठी वापरावे. 


 सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रिया करतांना घ्यावयाची काळजी :


 (१) रासायनीक व जैवीक बीजप्रक्रिया एकत्रितपणे मुळीच करु नये.

 (२) जर पेरणीच्या दिवशीच रासायनीक व जैवीक बीजप्रक्रिया करायचे काम पडल्यास रासायनीक बीजप्रक्रिया केल्यानंतर दोन तासांनी जैवीक बीजप्रक्रिया करावी.

 (३) बीज प्रक्रिया करतांना सोयाबीनचे बियाणे जोराने घासू नये कारण बियाण्याची उगवण शक्ती कमी होते.

???? ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे

 नैसर्गिक घटक असून, या बुरशीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम नाही.

???? बीजप्रक्रियेने उगवणशक्ती वाढून अंकुरण चांगले होते.

रोगकारक बुरशीचा संहार करते.

पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.

???? प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी.

ट्रायकोडर्मा बुरशीचा प्रभावी वापरासाठी आवश्यक बाबी  


???? जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असावेत.

ट्रायकोडर्मा चे पाकीट/द्रावण थंड जागेत सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.

???? रासायनिक बुरशीनाशक लावलेल्या बियाण्यास ट्रायकोडर्माची मात्रा दुप्पट करावी.

???? ट्रायकोडर्मा सोबत रायझोबीअम/अॅझोटोबॅक्टर/अॅझोस्पिरीलम तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणू या जैविक खतांची बीज प्रक्रिया करता येते.

Team कृषि शास्त्र???? ???? ???? 

Card image cap
अँग्रीकल्चर मधील स्टार्ट अप (Agriculture Startup) कंपनी 'अगधी'ने एक आर्टिफिशअल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी आणली आहे. (AI Technology) याच्या मदतीने बियाणे पाहून आपल्याला कसे उत्पन्न येईल याची माहिती होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य बियाण्यांची निवड करता येईल.
Card image cap
अनुवांशिक अभियांत्रिकी ज्याला अनुवांशिक बदल किंवा अनुवांशिक फेरफार असेही म्हणतात - हे जीवांचे (प्राणी किंवा वनस्पतींमध्ये) थेट फेरफार करत असतात आणि सामान्यतः आपण नाविन्यपूर्ण पिके तयार करण्यासाठी जैवतंत्रज्ञान वापरतो.

संपर्कात रहाण्यासाठी