कलिंगड, खरबूज, काकडी वरील रोग

blog image

               कृषि शास्त्र समुह 


        कलिंगड, खरबूज, काकडी वरील रोग


            कलिंगड, खरबूज, काकडी ही पिके कीड व रोगास फारच संवेदनशील आहेत. या पिकांवर भुरी, केवडा व मर हे रोग या वेळीच नियंत्रण आवश्‍यक आहे. 


मर

15-21 दिवसांनंतर - या रोगाचे दोन प्रकार आहेत. एक बुरशीमुळे होणारी फ्युजारियम मर व दुसरा जिवाणुमुळे होणारी मर. फ्युजारियम मर या रोगाचा प्रादुर्भाव केवळ कलिंगडामध्येच होतो. तर जिवाणूजन्य मरचा प्रादुर्भाव काकडी व खरबुजामध्ये जास्त दिसून येतो. फ्युजारियम मर या रोगग्रस्त खोडाचा मधोमध उभा काप घेतल्यास खोडाच्या लांबीला समांतर तपकिरी रंगाची रेष (उतीचा थर) दिसते. लागवडीनंतर 21-25 दिवसांनी वेलाची एक बाजू वाळते व संपूर्ण पीक नाहीसे होऊ शकते. जिवाणूजन्य मर रोगग्रस्त खोडातून दुधासारखा चिकट द्रव स्रवतो.



केवडा

दमट हवामानात केव्हाही - हा सुद्धा बुरशीजन्य रोग असून खूपच हानिकारक आहे. दमट हवामानात याची लागण व वाढ खूप जोमाने होते. पानांच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. पानांच्या खालच्या बाजूने पाहिल्यावर चिकट, ओले, फिकट हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके ठराविक आकारापेक्षा जास्त वाढत नाही. परंतु मोठ्या संख्येने असल्यामुळे पूर्ण पानभर पसरतात. यामुळे पाने वाळतात व संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.



भुरी

40-50 दिवसांनंतर - हा बुरशीजन्य रोग असून केवड्याप्रमाणे हाही खूपच नुकसानकारक आहे. यामध्ये पानांच्या दोन्ही भागांवर व खोडावर पावडरीसारखे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानांवर खूप जलद पसरतात.


एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन

फवारणी (लागवडीनंतर 25 दिवसांनी )

मर रोगाच्या नियंत्रणासाठी- कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड (50 टक्के ईसी) 2.5 ग्रॅम किंवा मेटॅलॅक्‍झील + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीतून द्यावे.

केवडा रोग- मेटॅलॅक्‍झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) दोन ग्रॅम किंवा झायनेब (72 टक्के डब्ल्यूपी) 4 ग्रॅम

भुरीच्या नियंत्रणासाठी- प्रोपिनेब (70 टक्के डब्ल्यूपी) 1.5 ग्रॅम मि.लि. किंवा

पेनकोनॅझोल (10 टक्के ईसी) 1 मि.लि.

टीम कृषि शास्त्र

Card image cap
सर्वसाधारणपणे पूजाविधी, सजावट इत्यादीसाठी फुलांचा वापर केला जातो. परंतु, अनेक फुलांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा प्राचीन काळापासून औषध म्हणूनही वापर केला जातो.
Card image cap
Agricultural education day
Card image cap
वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

संपर्कात रहाण्यासाठी