_हळद बेण्याची साठवण
♦️ हळदीचे कंद काढताना पूर्ण कालावधी झालेले परिपक्व (साधारण नऊ महिने पूर्ण झालेले) कंद काढावेत.
♦️ कंद काढतेवेळी ७२ ते ७५ टक्के पाण्याचा अंश असतो, तो साठवणुकीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास उगवणक्षमतेवर परिणाम होतो.
♦️ हळद काढणी झाल्यानंतर बियाण्यासाठीचे कंद लगेच किंवा शक्य तेवढ्या लवकर सावलीत ठेवावेत.
♦️ बेणे प्लॉट घ्यावयाचा असल्यास, हळकुंड बेणे वापरावे.
♦️ व्यापारी दृष्टिकोनातून लागवडीसाठी मातृकंद किंवा बंडा वापरावा.
♦️ बेणे साठवणुकीसाठी हळदीचा पाला/ पाचट/ गव्हाचे काड/ वाळलेले गवत यांचा वापर करावा.
♦️ वापरापूर्वी हे सर्व घटक *क्विनॉलफॉस २ मि.लि.* अधिक *कार्बेंडाझिम १ ग्रॅम* प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणाने फवारून निर्जंतुक करून घ्यावेत.
♦️ निर्जंतुकीकरणानंतर हे घटक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावेत.
♦️ बेणे सावलीमध्ये हवेशीर ठिकाणी साठवावे.
♦️बंद खोलीत, हवा खेळती राहत नाही, अशा ठिकाणी बेणे साठवू नये.
♦️ बेण्याच्या मुळ्या काढू नयेत.
♦️ मुळ्या काढल्यामुळे कंदास इजा होऊन साठवणुकीत कंद सडतात.
♦️ बेणे साठवताना त्याच्यावर कार्बेंडाझिम १ किलो प्रतिटन बेणे या प्रमाणात धुरळावे.
♦️ बेणे बुरशीनाशकांच्या द्रावणामध्ये बुडवू नये.
♦️ बेण्याचा ३ फूट उंच व जरुरीप्रमाणे लांबीचा ढीग करावा. बेण्याचा ढीग ३ फुटांपेक्षा जास्त उंचीचा केल्यास, उष्णता निर्माण होऊन कंद खराब होतात. पाऊस आल्यास बेणे झाकावे.
➖➖➖➖♦️♦️♦️➖➖➖➖