देऊळगाव राजा
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गिरोली खुर्द येथील पशुपालकांना चारा उपचाराचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
चाऱ्याचे रूपांतर सकस चाऱ्यामध्ये करण्याकरिता तसेच चाऱ्याच्या पोषणमूल्यांचा पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरिया, गुळ, मीठ ई. चे मिश्रण करून चाऱ्यावर प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते. चाऱ्याची चव, पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरे, गाई- म्हशी चारा खातात. पशुपालनामध्ये सर्वाधिक खर्च हा त्यांच्या चारा व पशुखाद्यावर होतो. ग्रामीण भागात जनावरांसाठी शेतातील उत्पादित पिकाचा चारा म्हणून उपयोग केला जातो. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या कमतरतेमुळे चारा घेणे अशक्य होते, या वेळेस जनावरांना फक्त उत्पादित पिकांचा वाळलेला चारा म्हणून उपयोग होतो. बाजारपेठेत तयार चाऱ्याची सरासरी 10 ते 12 रु. प्रतिकिलो दराने विक्री होते. परंतु, अशा चाऱ्याची गुणवत्ता चांगली असेलच याची खात्री नसते. जर प्रत्येक पशुपालकाने त्यांच्या गुरांच्या चाऱ्यावरती चारा प्रक्रिया केली तर हे नक्की त्यांना फायद्याचे ठरेल, यामुळे पशूपालकांचे खर्च वाचेल, चारा वाया जाणार नाही, जनावरांना योग्य प्रकारात पोषक आहार भेटेन व जनावरांचे आरोग्य चांगले राहील असे महत्त्व कृषी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले यावेळी शेतकरी आकाश म्हस्के, संतोष म्हस्के, भागवत म्हस्के, गणेश म्हस्के, संतोष जीणे, गुलाब म्हस्के, शिवाजी म्हस्के हे शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्रा. मोहजीतसिंग राजपूत, तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग प्रा. सचिन गोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या वेळी समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी धनेश ताकवले, पवन सानप, कार्तिक रिंढे, अमर सावळे, तसद्दुक शेख, अतुल शिराळे, बालाजी शिराळकर, राहुल शिराळकर, तुषार सोळंकी, अरविंद टारफे, निशांत सोनुने या कृषीदूतांनी हा उपक्रम पार पाडला.