हवामान: अंदाज
हवामान अंदाज:- 17/02/2021
विदर्भावर ९०० मिटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। इथुन द.कोंकण पर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे। सोबतच पुर्वेकडुन बाष्पयुक्त वारे हवेच्या खालच्या थरात वाहत आहेत।
मध्य भारतावर खंडित वारे आहेत आणि ही हवामान प्रणाली नैरुत्येकडे सरकत आहे।
वरील सर्व हवामान शास्त्रीय परिस्थिती मुळे आज विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात तर काही भागात बरेच ठिकाणी गडगडाटासह ह/म पावसाची शक्यता आहे। आज तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। विदर्भात नागपूर गडचिरोली चंद्रपूर भंडारा भागात गारपीट होऊ शकते। पश्चिम विदर्भात हलक्या मध्यम पावसाची गडगडाटासह शक्यता आहे।
तरीसुद्धा सावधान राहणे आवश्यक आहे।
अनिल बंड