१४/०२/२१ - आजचे हवामान अंदाज

blog image

   गेले काही दिवस वेस्टर्न डिस्टर्बंस च्या प्रभावामुळे विदर्भात किमान तापमान 8.0℃ पर्यंत खाली उतरले होते। परंतु आता वेस्टर्न डिस्टर्बंस चा प्रभाव कमी झालेला आहे तसेच वारे सुद्धा आता दक्षिणेकडुन वाहायला लागते असुन त्यामुळे विदर्भात तापमान वाढ झालेली आहे. कमाल तापमान 34℃ पर्यंत तर किमान तापमान 16℃ पर्यंत वाढले आहे। 

     मध्य महाराष्ट्रावर ९०० मिटर उंचीवर वाहत असलेले चक्राकार वारे आणि इथुन केरळपर्यंत असलेली कमी दाबाची द्रोणिय स्थिती आणि सोबतच पुर्वेकडुन हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे , या सर्व हवामान शास्त्रीय परिस्थिती मुळे १६-१७ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे। तसेच ऐखाद्या दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे।

अनिल बंड

Card image cap
हवामान: तापमान ०४/०२ किमान: ११.० कमाल: ३१.० स्कायमेट: 32, 9.0℃ भारत सरकार: 13.5 अनिल बंड

संपर्कात रहाण्यासाठी