*हवामान सूचना:*
नागपूर जिल्ह्यामध्ये, भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या अंदाजानुसार,
दिनांक १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ आणि आणि दिनांक १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस शक्यता वर्तविण्यात आली आहे.
*शेतकरी बांधवांसाठी सूचना:* पाऊस होण्याची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकाची तात्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाची वेचणी राहिली असल्यास लवकरात लवकर वेचणी करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील पिकास आवशक्यता नसल्यास ओलीत करणे पुढे ढकलावे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतात काम करता असताना मेघगर्जनेचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
*सौजन्य:* ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर.