पाकिस्तान वर असलेला वेस्टर्न डिस्टर्बंस आता जम्मू काश्मीर वर 3 ते 6 कीमी उंचीवर आहे , चक्राकार वारे आणि ट्रफच्या प्रभावामुळे पश्चिमेकडून बाष्प युक्त वारे वाहत आहेत। सोबतच हरियाणा बांगला देश आणि कोमोरिन वर चक्राकार वारे वाहत आहेत।
आज उत्तराखंड मध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी/पाऊस होऊ शकतो। विदर्भात *पुढील ४-५* दिवसात किमान तापमान *१४-१५℃ पर्यंत पोहचु शकते।
*पश्चिमेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि चक्राकार वारे यांच्या प्रभावामुळे
येणाऱ्या १५-१६ फेब्रुवारी रोजी मध्य भारतात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे।। त्यामुळे याच कालावधीत विदर्भात तुरळक पावसाची शक्यता नाकारता येत नाही।
अनिल बंड