हवामान ०५ फेब्रुवारी '२१
जम्मू काश्मीर वर चक्राकार वार्यांच्या स्वरूपात वेस्टर्न डिस्टर्बंस सक्रिय आहे।
यामुळे जम्मू काश्मीर मध्ये बर्फ वृष्टी होत असल्याने राजस्थान पंजाब हरियाणा या भागातील किमान तापमान ५-७ ℃ ने घसरले आहे। त्याचप्रमाणे या भागातुन वाहणारे उत्तर-पश्चिम कोरडे आणि थंड वारे प्रबळ होत असल्याने ही थंडी हळूहळू मध्य प्रदेश विदर्भापर्यंत पोहचण्यासाठी वातावरण अणुकुल आहे।
ईशान्य म.प्र.वर ९०० मिटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असुन इथुन विदर्भापर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे। या परिस्थिती मुळे
०५-०६ तारखेला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। परंतु 15 फेब्रुवारी पर्यंत पावसाची शक्यता नाही।
विदर्भात उद्यापासून पुढील ०३ दीवस किमान तापमान ३ ते ५℃ ने कमी होण्याची शक्यता आहे । ०६ ते ०९ फेब्रुवारी या कालावधीत किमान तापमान १० ℃ च्या पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे।
अनिल बंड