हवामान: अंदाज
हवामान ०४ फेब्रुवारी '२१
उत्तर पाकिस्तान वर चक्राकार वार्यांच्या स्वरूपात वेस्टर्न डिस्टर्बंस सक्रिय आहे। सोबतच हवेच्या खालच्या स्तरात राजस्थान वर चक्राकार वारे वाहत आहेत। सदर हवामान शास्त्रीय परिस्थिती मुळे विदर्भात .०५ तारखेला तुरळक ठिकाणी ह/म पावसाची शक्यता आहे। हा *पाऊस* पडण्याची शक्यता पुर्व विदर्भात जास्त आहे। ०५-०६ तारखेला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे।
विदर्भात उद्या किमान तापमानात थोडी वाढ होईल। ०६ फेब्रुवारी पासुन किमान तापमानात पुन्हा घट येईल। ०८ तारखेच्या आसपास रात्री चे तापमान १०℃ पर्यंत घसरण्याची शक्यता आहे।
अनिल बंड